चित्रलेखा पाटील यांच्याकडून सांत्वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते बाळाराम केशव पाटील यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी (दि.19) पाटील यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

बाळाराम पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी चिंचोटी येथील पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची विचारपूस केली. त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच मोहन धुमाळ, देवायनी पाटील, संजय पाटील, महेश झावरे, नितीन झावरे, अक्षय डिकले, तसेच दिवंगत बाळाराम पाटील यांचे सुपूत्र हेमंत पाटील, योगेंद्र पाटील, जयेंद्र पाटील व पाटील कुटूंबिय उपस्थित होते.

Exit mobile version