भूगोल विषयक कार्यशाळेचे आयोजन

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
पालीतील शेठ पालीवाला महाविद्यालयात भूगोल विषय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फॅक्टर संस्था व डॉ. हेमंतकुमार पेडणेकर यांच्यामार्फत रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना प्रात्यक्षिक भूगोलाचे विनाशुल्क साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख सर्जेराव पाटील यांनी केले. माजी प्राचार्य युवराज महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. हेमंत पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक पीपीटीद्वारे तसेच प्रत्यक्ष विद्यार्थी सहभाग घेऊन दाखविले.

भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमातील संकल्पना सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या. उपप्रचार्य लिमन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रा.हरिदास घोलवे, भूषण सुतार, अजित खरोसे, नागोठकर तर प्राध्यापिका स्वाती गोळे, सविता गोळे आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित खरोसे तर आभार प्रदर्शन प्रशांत नागोठकर यांनी केले.

Exit mobile version