अलिबाग | वार्ताहर |
लोकनेते कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड, आरडीसीसी बँक संचालक ज्ञानेश्वर भोईर, अॅड. कस्तुभ धामणकर, युवा नेते लहू चव्हाण, संजय चव्हाण, नरेश मोरे, धवल टिळक, दिलीप लोखंडे, मारुती आडळले, नामदेव बारे, यशवंत बारे, सुनील बारे, धनेश कातूरडे, महादेव जगतात, राज गायकवाड आदी उपस्थित होते.