सिटीबस सेवा पूर्वरत होण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

। खोपोली । प्रतिनिधी ।
शहरातील सिटीबस सेवा पूर्वरत होण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खोपोली शहर काँग्रेसच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.
खोपोली काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांच्या नेतृत्वाखाली दि.13 डिसेंबर रोजी हे धरणे आंदोलन होणार असून, या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते व सिटी बस सुरू होण्यासाठी आग्रही असलेले सर्वसामान्य नागरिक ही मोठया संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कोरोना संकट सामान्य होऊन अन्य सर्व सेवा सुविधा नियमितपणे सुरू होऊनही खोपोली परिवहन विभागाच्या अंतर्गगत असलेली खोपोली सिटीबस सेवा मात्र अद्यापही बंद आहे. ही सेवा नियमितपणे सुरू व्हावी यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी पालक व शहर काँग्रेस कडून सतत पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र नगरपालिका प्रशासन व परिवहन सभापती यांच्या वारंवार आश्‍वासना नंतरही अद्याप ही सेवा सुरू झाली नसल्याने खोपोली शहर काँग्रेसने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले आहे.

Exit mobile version