भाजपच्या दानवाचा काँग्रेसकडूनही निषेध

पनवेल | वार्ताहर |
नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या दानवाचा समावेश झाला आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रात जनादेश यात्रा काढल्या जातात असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांचाय बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्याचाच निषेध म्हणून रायगड जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमकता दाखवत भाजपच्या दानवाला रायगड जिल्ह्यात तीव्र निषेध करण्याचा इशारा दिला आहे.
आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली तर भाजप मध्ये लगेच बढती मिळते असे सध्या देशात सर्वत्र चालू असल्याचे दिसत आहे. या वक्तव्याबद्दल रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी न मागितल्यास रायगड जिल्हा युवक काँग्रेसतर्फे त्यांना जिल्ह्यात तीव्र निषेध केला जाईल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Exit mobile version