अलिबागमध्ये वरातीमागून घोडे
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या अवमानकारक उद्गारनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. रायगड जिल्ह्यात सकाळपासून सर्वत्र जोरदार आंदोलन छेडत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि आमदार असलेल्या अलिबाग तालुक्यात मात्र नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर सांयकाळी 4 नंतर भाजप विरोधात फक्त घोषणाबाजी करत आंदोलन उरकण्यात आले. यावेळी पोलीस उप अधीक्षक यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली.