बावनकुळेंविरोधात काँग्रेसची अलिबागमध्ये निदर्शने

| अलिबाग | प्रतिनिधी |

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात अलिबागमध्ये युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. अलिबागमधील भाजपच्या कार्यालयासमोर जमाव करीत बावनकुळे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे सचिव एहसान खान, रायगड जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष निखील डवळे, उपाध्यक्ष आकाश राणे, जिल्हा निरीक्षक अनिकेत नवले, पेण विधानसभा अध्यक्ष रोहित म्हात्रे, उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत, रायगड जिल्हा काँग्रेस युवक उपाध्यक्ष तसबूर अधिकारी, सचिव प्रशांत खाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ शहरात कसीनोमध्ये जाऊन एका रात्रीत सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गरीबांचे पैसे जुगार व उद्योगपतींसाठी उधळले जात आहेत, असे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. त्या निमित्ताने भाजपच्या बावनकुळेंविरोधात युवक काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत मंगळवारी (दि.21) रोजी भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली.

Exit mobile version