पोलादपूरमध्ये उद्या काँग्रेसचा मेळावा

पोलादपूर | प्रतिनिधी |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पोलादपूर तालुका कार्यकारिणीतर्फे गुरूवारी(18 नोव्हेंबर)सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचा जाहिर मेळावा आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून याप्रसंगी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,अशी माहिती तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय सलागरे यांनी येथे दिली.
पोलादपूर तालुक्यातील अतिवृष्टी व दरडग्रस्त भागातील बाधितांच्या पुनर्वसनाच्या पार्श्‍वभूमीवर आवर्जून पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाचा पाहणी दौरा करणार्‍या पुनर्वसनमंत्री ना.वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पोलादपूर तालुका काँग्रेस कार्यकारिणीतर्फे जाहिर मेळावा आणि आढावा बैठकीवेळी पोलादपूर नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

Exit mobile version