। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर यांनी माघार घेत शेकापला बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
चित्रलेखा पाटील शेकापच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान राजा ठाकूर यांनीदेखील अलिबागमध्ये अर्ज दाखल केला होता. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी तसेच पक्ष श्रेष्ठींच्या सुचनेनुसार राजा ठाकूर यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठींबा दर्शविला आहे. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना काँग्रेसने पाठींबा दर्शविल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला आहे.राज्यातील महायुतीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.