| पनवेल । वार्ताहर ।
समाजातील नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण होऊन संविधानाने उच्चवर्णीय ते तळागाळातील पीडित, शोषित, वंचित अशा सर्व प्रजासत्ताक भारताच्या जनतेला दिलेले संवैधानिक अधिकार त्याना माहीत व्हावे या उद्देशाने प्रेरित होऊन शेतकरी कामगार पक्षाचे विचुंबे यांच्या विद्यमाने पुरुषोत्तम भोईर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.30) रोजी सायंकाळी 6:00 वाजता पोलीस चौकी जवळ, विचुंबे, पनवेल येथे संविधान जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. बाळाराम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, व्याख्याते मनोज महाले हे आपल्या व्याखानाने उपस्थितांना मार्गदर्शन करतील. सदर कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवर, नेते, समाजसेवक, विचारवंत ही सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम पुरुषोत्तम भोईर मित्र मंडळ, भिमरत्न फाउंडेशन, शिल्पकार सामाजिक संस्था, सारनाथ बुद्ध विहार, विचुंबे यांनी आयोजित केला असून विभागातील सर्वच ओबीसी, एस.सी., एस.टी., एन. टी. यांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती पुरुषोत्तम भोईर यांनी केले आहे.