जेसीबीखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यातील धनकवडी परिसरात जेसीबीखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

धनकवडीतील अष्टद्वार सोसायटी परिसरात बांधकाम सुरू होते. गेल्या महिन्यात तेथे काम करताना मजूर राहुल जाधव (18) जेसीबी यंत्राखाली झोपला होता. ही बाब जेसीबीचालक मुकेश यादव (27) याच्या लक्षात न आल्याने त्याने यंत्र सुरू केले. यंत्रातील लोखंडी बकेट त्याने वर उचलली आणि पुन्हा खाली आणली असता लोखंडी बकेट जाधवच्या पोटावर पडली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी यंत्रचालक मुकेश यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version