| रसायनी | प्रतिनिधी |
भोकरपाडा परिसरातील हिरानंदानी फॉर्च्यून सिटी गृहप्रकल्पाच्या साईटवर काम करत असताना डोक्यावर लोखंडी पाईप पडून गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हबीबूर बहारुद्दीन रहमान (51) रा. बारीओल, पो. छोघरा, जि. कटिहार, बिहार असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीबूर रहमान हे हिरानंदानी फॉर्च्यून सिटी येथे बांधकाम साईटवर काम करत होते. काम सुरू असताना अचानक त्यांच्या डोक्यावर एक लोखंडी पाईप पडल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात घडताच त्यांना तातडीने उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.







