माथेरानमध्ये पावसाची दमदार हजेरी

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये गेले दोन दिवस पावसाने संततधार सुरू ठेवली असून, माथेरानला चांगले झोडपले आहे. पाणीटंचाईने त्रासलेल्या माथेरानकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पर्यटक देखील माथेरानमधील पावसाचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर धूक्याच्या चादरीमुळे येथील निसर्ग अधिकच खुलला आहे. तसेच, नेरळ-माथेरान घाटातील धबधबे ही प्रवाहित झाल्यानंतर उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी (दि.1) सकाळी आठ वाजेपर्यंत 17:4 मिमी इतकी पावसाची नोंद झाली. तर, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 84 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला असल्याने नागरिकांना पालिकेकडून सावधतेचा इशारा देण्यात आला होता. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या असून पत्रकार मिलिंद कदम यांच्या घरावरही झाडाची मोठी फांदी पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version