| उरण | वार्ताहर |
उरण बोकडवीरा – जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेल्या झाडांवर ठेकेदारांनी जेसीबी फिरविल्याची दुदैवी घटना उरण तालुक्यात घडली आहे. त्यामुळे नागरीक व पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्यांनी उरण – पनवेल या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विविध झाडांचे संवर्धन व जतन करण्याचे काम जुनं ते जुलै 2022 या महिन्यात हाती घेतले. परंतु संबंधित ठेकेदारांनी उरण बोकडविरा – जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या साईट पट्टीवरील वाढलेले गवत जेसीबी मशीने काढण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु सदर कामात गवता बरोबर नूकताच लागवड करण्यात आलेली झाडे ही जेसीबी मशीनच्या खाली आल्याने प्रवाशी नागरीक व पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या उरण करळ – बोकडवीरा रस़्त्यावरील खड्डे भरण्याचे काम व साईट पट्टीवरील वाढलेले गवत काढण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु सदर रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेली झाडे ही आमच्या खात्याची परवानगी न घेता लागवड करण्यात आली आहेत. तरी पण जेसीबी मशीनच्या खाली झाडे आलेली आहेत की नाही याची माहिती नाही. माहिती उपलब्ध झाल्यावर आपणांस कळविण्यात येईल.
नरेश पवार
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण
उरण तालुक्यातील रस़्त्यांच्या कडेला लागवड करण्यात आलेली झाडे ही उरण वन विभागाच्या माध्यमातून लागवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे वन विभागाला सदर घटनेची माहिती नाही.
श्री कोकरे
वरिष्ठ अधिकारी, वन विभाग, उरण
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ठिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. उरण – जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेच्या जागेवरील लागवड करण्यात आलेली झाडे जेसीबी मशीनच्या खाली तूटली आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्याचे पंचनामे करण्यात येत आहे
सौ.सावंत
वरिष्ठ अधिकारी, सामाजिक वनीकरण