पर्यटकांमध्ये जोरदार धक्काबुक्की
| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांचे लोंढे येत आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी असलेली नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन बंद असल्याने पर्यटक हे मिनीट्रेन म्हणून प्रवास गाडीची वाट पाहात असतात. त्यात तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ असल्याने त्याचा परिणाम पर्यटक आणि प्रवासी यांच्यात धक्काबुक्की होण्याची घटना माथेरान अमन लॉज या ठिकाणी झाली. दरम्यान, त्या ठिकाणी कोणीही सुरक्षाकर्मी उपलब्ध नसल्याचे आढळून आले असून, रेल्वे तिकीट घराजवळ सुरक्षकर्मी ठेवण्याची मागणी होत आहे.
माथेरान मध्ये सध्या पर्यटकांचे लोंढे येत असून, पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन बंद आहे. त्यामुळे हे सर्व पर्यटक माथेरान मॅन लॉजदरम्यान चालविल्या जाणाऱ्या शटल गाडीमधून प्रवास करता यावा यासाठी माथेरान आणि अमन लॉज स्थानकात तसं तास थांबून शटल गाडीचे तिकीट मिळवीत असतात. तासभर तिकिटाच्या लाईन मध्ये उभे राहून तिकीट मिळणार नसेल तर पर्यटकदेखील नाराज होतात. अशीच नाराजी अमन लॉज स्थानकात पाहायला मिळाली. अमन लॉज माथेरान शटल गाडीची तिकीट मिळविण्यासाठी तिकिटाच्या रांगेत असलेल्या पर्यटकांना तिकीट मिळण्यात आलेल्या अडचणी यामुळे रांगेत उभे असलेल्या पर्यटक यांच्यात धक्काबुक्की आणि नंतर हाणामारीची घटना घडली.
दोन गटातील 15-20 पर्यटक यांच्यात अमन लॉज स्थानकातील तिकीट खिडकीसमोर धक्काबुक्की आणि हाणामारी होत असताना मध्य रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी प्रवाशांची भांडणे थांबवण्यासाठी पुढे आले नाही. त्याचवेळी रेल्वे प्रशासनातील एकही सुरक्षकर्मीदेखील हा प्रकार सुरु असताना तेथे उपलब्ध नव्हता. त्यामुळे रेल्वेकडून प्रवाशांच्या आणि रेल्वे कर्मचारी यांच्या सुरक्षाविषयक काळजीबाबत जागरूकता घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.






