। तळा । वार्ताहर ।
तळा तालुका क्षत्रिय मराठा समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. मराठा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे अध्यक्ष सुभाष पाशीलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच, तीन वर्षांसाठी नविन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्षपदी सुभाष पाशीलकर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे, सचिव दीपक भोसले, सहसचिव नरेश सुर्वे, खजिनदार शरद चव्हाण व सहखजिनदारपदी मदन कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







