अधिवेशनानिमित्त अलिबागमध्ये नागरीकांकरिता विविध प्रशिक्षण कार्यशाळा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र, गोवा व गुजराथ या तीन राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशन काशीद (मुरुड) येथे संपन्न होत असून या अधिवेशनानिमित्त अलिबाग येथे सामान्य नागरिक, पालक, पत्रकार, पोलीस, परिचारिका किशोरवयीन पाल्य व डॉक्टरांसाठी सहा ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
यात प्रामुख्याने पालकांकरिता डॉक्टर मुले अशी का वागतात (पी.एन, पी. सभागृह), परिचारिकांकरीता नवजात बालकांची शुश्रूषा(जिल्हा परिषद सभागृह), पोलीस कर्मचार्यांकरिता जीवनरक्षक उपचार पद्धती (जंजिरा सभागृह), किशोरवयीन मुलांच्या समस्या (पी.एन. पी.विद्यासंकुल) गुदमरलेल्या बालकांच्या समस्या आर. पी. वर्कशॉप (मॅपल इन हॉटेल), तर डॉक्टरांसाठी लहान मुलांच्या आजारावर उपचार या संदर्भात जिल्हा परिषद सभागृह सभागृह अशा विविध ठिकाणी या कार्यशाळा गुरुवार दि.25 नोव्हेंबर संपन्न होत आहेत. या निमित्ताने वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदशर्न संबंधितांना उपलब्ध होणार आहे.
एन. सर्व पालक नागरिक, पोलीस कर्मचारी, पालक, परिचारीका व डॉक्टर्स यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या अधिवेशनाचे प्रमुख संयोजक, डॉ. हेमंत गंगोलिया, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड), जिल्हा अध्यक्ष डॉ सुनीता इंगळे, डॉ. विनायक पाटील ( अलिबाग) व डॉ. राजेंद्र चांदोरकर (अलिबाग) यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. विनायक पाटील व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांचेशी संपर्क साधावा. या कार्यशाळेकरिता जमताना कोव्हीड संबंधातील सर्व सामाजिक नियमांचे पालन करण्याच्या सर्व सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
डॉक्टर मुलं अशी का वागतात? उद्या परिसंवाद
राष्ट्रीय बालरोग संघटनेच्या रायगड शाखेने आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग व परिसरातील पालक-शिक्षकांकरिता गुरुवार दि. 25 नोव्हेंबर रोली एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील निवडक तज्ज्ञ पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद निःशुल्क असून डॉ जयंत पांढरीकर (अलिबाग), प्रा डॉ निवेदिता पाटील, कोल्हापूर, डॉ अमोल अन्नदाते, वैजापूर, डॉ राजीव धामणकर, अलिबाग आणि डॉ चंद्रशेखर दाभाडकर,महाड यांचा यात समावेश आहे. अलिबाग येथील पीएनीपी सभागृहात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार्या या परिसंवादाचे उद्घाटन जिल्हाधिकारी महेश कल्याणकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक डॉ विनायक पाटील, डॉ राजेंद्र चांदोरकर, डॉ निशिगंध आठवले यांनी केले आहे.