| अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथील सहयोग मित्रमंडळच्या वतीने महिलांकरीता पाक कलास्पर्धा व फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अलिबाग नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मानसी म्हात्रे यांचा सहयोग मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ट्रॅडिशनल रेसलिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त तनया मंचेकर हिचाही मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मंडळाचे कार्यकर्ते धनंजय मंचेकर, जयेश मांडवकर, दीपक मांडवकर, महेश सिनकर, संजय ढोरे, नितीन साळवी, परमानंद पाटील, प्रशांत मालवणकर, मंगेश सिनकर, विवेक पवार, मानस मांडवकर, चिराग मांडवकर, किरण मंचेकर, धीरज ढोरे, सुनील ढोरे, सुनील झोरे, अनिल झोरे, सुधीर झोरे, मुकुंद ठाकूर, प्रमोद झुंजारराव, ओमकार पाटील, अक्षय पाटील यांनी मेहनत घेतली. मयुर बेकरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उमेश पवार, शशांक पाटील, डॉ. राहुल म्हात्रे, सुहास म्हात्रे, श्री. मेहता, अजिंक्य कर्वे, मंदार राऊतआदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या ज्योती मांडवकर, सायली मांडवकर, धनश्री मंचेकर, मनिषा झोरे, सुनीता ढोरे, नयना ढोरे, अंजली मालवणकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.