उरण पोलिसांना कोरोनाची लागण

उरण | वार्ताहर |
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासकीय कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. उरण पोलीस ठाण्यातील 17 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर इतरांची तपासणी सुरू असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. तरीही याचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय पातळीवर तपासणी सुरू आहे. परंतु, याचा न कळत त्रास शासकीय कर्मचारी वर्गाना होताना दिसत आहे.
गुन्ह्यातील आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उरण पोलीस ठाण्यातील 17 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते. इतर पोलिसांची तपासणी सुरू आहे. त्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सूत्राकडून वर्तवली जात आहे. तरी जनतेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमाचे पालन करण्याचे आवाहन शासकीय प्रशासन यंत्रणेकडून केले जात आहे.

Exit mobile version