। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता सोनिया गांधी यांना दुसर्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.