रायगड जिल्ह्यात रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

419 रुग्ण; दोन मृत्यू, 1 हजार 507 कोरोनामुक्त,
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत मोठया प्रमाणावर आढळणारी रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून गेल्या पाच सहा दिवसांपासून आढळणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या तिपटीहून अधिक दिसत आहे. शनिवार दि. 29 जानेवारी रोजी कोरोनाच्या 419 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 938 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शनिवारी पनवेल महापालिका हद्दीत 167, पनवेल ग्रामीण 31, उरण 4, खालापूर 23, कर्जत 12, पेण 44, अलिबाग 58, मुरुड 4, माणगाव 25, तळा 3, रोहा 13, सुधागड 1, श्रीवर्धन 10, म्हसळा 4, पोलादपूर 2 तर महाड 18 असे 419 रुग्ण आढळले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 995 झाली आहे. यापैकी 2 लाख हजार 413 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 644 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 938 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version