महानगरपालिकेची अनधिकृत दुकानांवर कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।
खारघर वसाहत परिसरातील अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे. खारघरमधील सेक्टर 34, 35, 36, 37 मध्ये अनधिकृत ढाबे, गाड्या सर्व्हिसींग दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने यांच्यावरती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चार भंगार दुकाने, एक गाडी सर्व्हिसिंग दुकान, पाच झोपड्या, तीन ढाबे अशा एकूण 13 अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

खारघरमध्ये अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने ढाबे, सर्व्हिसिंग दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने या सर्वांवरती आयुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर खारघर प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने उपायुक्त कैलास गावडे यांच्या सूचनेनुसार प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साह्याने या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

Exit mobile version