। गुहागर । प्रतिनिधी ।
कोतळूक उदमेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटीची चोरी करणार्या चोरट्याच्या अवघ्या चार तासात मुसक्या आवळण्यात गुहागर पोलिसांना यश आले आहे.
कोतळूक उदमेवाडी येथील हनुमान मंदिरात दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीची चोरी झाली. ही घटना सोमवारी (दि. 02) मध्यरात्री घडली होती. चोरी झाल्याचे सकाळी येथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ गुहागर पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला होता. अखेर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून संशयित चोरटा सौरभ कदम याला अवघ्या 4 तासात गुहागर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.