| मुंबई | वृत्तसंस्था |
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा दैनिक कृषीवलचे वृत्त संपादक अलिबाग येथील पत्रकार भारत रांजणकर यांना मराठी पत्रकार परिषदेचा दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर रोजी पुण्याजवळ उरूळी कांचन येथे होत आहे.