तंबाखूमुक्तीसाठी समुपदेशन केंद्र

| खोपोली | वार्ताहर |

खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद रुग्णालयामध्ये बजाज इनडेच्या माध्यमातून तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई- कर्करोग प्रतिबंध विभाग, खोपोली यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. या केंद्राचे उद्घाटन बुधवार दि.19 एप्रिल रोजी बजाज इनडेफचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भल्ला व बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मधुरा तळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखेडे, बजाज इनडेफचे किरण मुकादम, तेजस चिकसे व त्यांचे सहकारी, महिला व बाल कल्याण समितीचे सदस्य, टाटा स्टील कंपनीचे अधिकारी, विविध शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच टाटा मेमोरिअल सेंटरच्या डॉ. शर्मिला पिंपळे, डॉ. प्रतिभा पाटील व त्यांचे सर्व सहकारी व पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.

Exit mobile version