| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र, निवडणुकीच्या निकालासाठी एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. अखेर ही प्रतीक्षा संपली असून आज (दि.9) सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीला सुरुवात होताच नागरिकांसह उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले असून नेमका कौल कोणाच्या बाजूने लागणार? याबाबत अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
