विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील 10 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. जवळपास दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय नेत्यांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणीसाठी काँग्रेसचे अभिजीत वंजारी, सतेज पाटील, अमर राजूरकर हे प्रतिनिधी असून मतमोजणी ठिकाणी भाजपकडून संजय कुटे आणि आशिष शेलार यांची उपस्थिती आहे.

भाजपनं या निवडणुकीत 5 जणांना उमेदवारी दिली होती. प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड हे भाजपकडून रिंगणात होते. तर महाविकास आघाडीमधील शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांनी निवडणूक लढवली.

Exit mobile version