। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला कूरुळ येथील क्षात्रेक्य समाज सभागृहात आज सुरुवात झाली. थोड्याच वेळात निकाल जाहीर होतील.
पहिल्या टप्प्यात अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1493 पैकी 1321 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्के वारीनुसार 88 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात मुरूड, पेण आणि कर्जत तालुक्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागापैकी 7 बिनविरोध तर 11 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 6, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 3 तर हमाल/मापारी मतदार संघात महविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे.