पतसंस्था ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करताहेत- चित्रलेखा पाटील

सुमित्र पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

| रेवदंडा | वार्ताहर |

पतसंस्था ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करीत असून, पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे उद्गार शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले. त्या रेवदंडा सुमित्र पतसंस्थेच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित पतसंस्थेच्या सभासदांशी संवाद साधताना बोलत होत्या.

रेवदंडा सुमित्र पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 24 सप्टेंबर रोजी भंडारी समाज हितवर्धक सभागृह मोठे बंदर, रेवदंडा येथे सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली. पतसंस्थेच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेस शेकापक्षाचा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील तसेच शेकापचे अलिबाग व मुरूड मतदारसंघ अध्यक्ष संदीप घरत, नागाव ग्रा.पं. सदस्य हर्षदा मयेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे होते. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष खलिल तांडेल, संचालक महेंद्र नाईक, संचालक उमेश कोंडे, संचालक राजेंद्र वाडकर, संचालक अशोक हवालदार, संचालक विजय चौलकर, संचालक सदानंद घरत, संचालिका रेश्मा गणपत, संचालिका प्रतिभा वरसोलकर, संचालिका कमरजब्बीन मुज्जफर मुकादम, तज्ज्ञ संचालक सलिम अब्बास तांडेल, तज्ज्ञ संचालिका मालती ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नागावकर, व्यवस्थापक क्रांती जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती प्रशांत जाधव यांनी केले.

प्रारंभी उपस्थित सभासदाचे स्वागत पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे यांनी केले, त्यानंतर दिवंगताना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या व्यवस्थापक क्रांती जाधव यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तात वाचन, वैधानिक लेखापरीक्षक यांचे अहवालासह सादर केला.

यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत संचालकांच्या हस्ते क्रीडा शिक्षक श्री. मोकल, शरद वरसोलकर, सुरेश खोत, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सुमित्र पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे, उपाध्यक्ष खलिल तांडेल व संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नागावकर, व्यवस्थापक क्रांती जाधव, रोखपाल नरेश सुर्वे, शिपाई अरूणा गंद्रे, पिग्मी एंजट अल्पेश घरत, ॠषीकेश टेकाळकर, निलेश भट्टीकर आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version