रायगड जिल्ह्यातील आठ पंच उतीर्ण
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल एमसीएकडून जाहीर करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार क्षेत्रातील 21 जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण झाले आहेत.
वरुण म्हात्रे-उरण, विघ्नहर्ता मुंढे-पनवेल, सागर मुळे-पेण, रोहन पाटील-उरण, अभिजित वाडकर-अलिबाग, चंद्रकांत चौधरी-कर्जत, निशांत माळी- रसायनी, प्रशांत माळी-उरण अशी त्यांची नावे आहेत.
येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा आहे. महाराष्ट्रातील सर्व पंचांना एमसीएच्यावतीने ऑनलाईन व कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील पांचासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने माजी रणजी खेळाडू व विद्यमान बीसीसीआय पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असोसीएशनचे पंच राजन कसबे व रायगड जिल्ह्यातील क्रिकेट तज्ञ नयन कट्टा यांनी गेले दोन महिने अथक परिश्रम घेऊन ऑनलाइन व कार्यशाळाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या पुढेही करत रहाणार आहेत. पंच शिबिरासाठी विनामूल्य हॉल आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे खोपोली व डी.के भोईर उरण यांनी उपलब्ध करून दिला. तसेच सर्व पंचाना मार्गदर्शन मिळावे यासाठी अॅड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, शंकर दळवी, सुयोग चौधरी यांनी परिश्रम घेतले. सर्व उतीर्ण झालेल्या पंचांचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू, क्रिकेटप्रेमींनी अभिनंदन केले.