मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील उंडरगाव येथील अविनाश नाईक यांच्या राहत्या घरात घुसून शिविगाळ व हाताबुक्यांने मारहाण केल्या बद्दल 4 जणांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील अविनाश नाईक यांना मारहाण केल्याची तक्रार अपर्णा नाईक यांनी मुरुड पोलिसांत केली आहे.यावरुन गावातील आशिष म्हात्रे, किरण दत्ता म्हात्रे, निलेश भालचंद्र म्हात्रे, विराज नितिन गुंड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक परशुराम कांबऴे करी आहेत.

Exit mobile version