अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

| रसायनी | वार्ताहर |

गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशाकारक व अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपोनि संदीप पोमन व पथक यांना गोपनीय बातमीदाराद्वारे खात्रीशीर बातमी मिळाली की, समीर अब्दुलकलाम शेकदरे (38), दानिश रफिक फनसोकर (30) दोघेही रा. शेखाडी, ता. श्रीवर्धन, जि रायगड हे दोघे चरस हा अमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी म्हसाळ गोरेगाव रोडवरती गोरेगाव दर्गा येथे नाकाबंदी करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडून पाच लाख सतरा हजारांचा 1.37 किलो ग्रॅम चरस, 95 हजार रुपये किमतीची लाल काळ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल असा एकूण सहा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमन, एएसआय राजेश पाटील, एएसआय प्रसाद पाटील, संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, झेमसे यांनी कारवाई केली.

Exit mobile version