| पनवेल | वार्ताहर |
महागडे मोबाईल चोरणार्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने त्याब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे महागडे 4 मोबाईल ज्याची किंमत जवळपास 1 लाख 55 हजार रुपये इतकी आहे, ते हस्तगत केले आहेत. फिर्यादी माधवी सोनवणे ह्या पायी चालत जात असताना यातील आरोपींनी आपसात संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्कुटीवरून येऊन तिच्या हातातील महागडा मोबाईल खचून ते पळून गेले होते. याबाबतची तक्रार सानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करताच सदर गुन्ह्याच्या समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, पो.हवा. रमेश शिंदे, अनिल पाटील, तुकाराम सुर्यवंशी, मधुकर गडगे, सचिन पवार, रणजित पाटील, अजित पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, पो.ना. अजिनाथ फुंदे, पो.शि. संजय पाटील, विक्रांत माळी आदींचे पथक गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार जावेद शेख (वय 23 रा. मुंब्रा), त्याचा सहकारी इरफान शेख (वय 22 रा. कळवा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीच्या मोबाईलसह इतर तीन मोबाईल व त्यांच्याकडे असलेली पल्सर मोटारसायकल असा मिळून जवळपास 1 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींना सानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
महागडे मोबाईल चोरणारे सराईत गुन्हेगार ताब्यात
