| पुणे | प्रतिनिधी |
तातडीने आवश्यकता असल्याने राज्याच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी भरती करण्यात येत आहे. या संदर्भातला आढावा मी घेतला असून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिक्षण विभागातही आम्ही भरती करणार आहोत. शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना काही ठिकाणी घेतले आहे, असा दावा केला. अजित पवार यांनी मात्र विरोधकांनी या मुद्दयावर अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले आले.
सध्या राज्यात विविध विभागात एक लाख 50 हजार मुला-मुलींची भरती सुरु आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने भरती करण्यात येत आहे. राज्यातील आतापर्यंत सगळ्यात मोठी भरती करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती, असे अजित पवार म्हणाले. पण कारण नसताना मला ट्रोल केले जात असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. विरोधक चुकीची अफवा पसरवत असल्याचा आरोप पवार यांनी केला. दरम्यान, शुक्रवारी पुण्यामध्ये कंत्राटी भरतीच्या विरोधात विर्द्यार्थी संघटनांनी निषेध आंदोलन केले.