खरीप हंगामासाठी पीककापणी प्रयोग

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी 1944 पासून खरीप व रब्बी हंगामात पीककापणी प्रयोग राबवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीककापणी प्रयोगासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारित यादीनुसार गावनिहाय एकूण 18 गावांसाठी प्रत्येकी दोन असे एकूण 36 पीककापणी प्रयोग निश्‍चित केले आहेत. त्यानुसार आंबेतर्फे वाजे येथे दोन शेतकर्‍यांच्या शेतात सुवर्णा या भातपिकाची कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आली.

महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटप करून आणि समन्वय साधून पीककापणी प्रयोगाची आखणी व अंमलबजावणी अनेक वर्षे सुरू आहे. सरकारच्या निर्देशानुसार सर्व पीककापणी प्रयोग महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांना नेमून दिले आहे. संबंधित पर्यवेक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयोग यशस्वी करून त्याची माहिती सरकारच्या सीसीई-अ‍ॅग्री या अ‍ॅपवर अपलोड केली जात आहे. तालुक्यातही खरीप हंगामासाठी पीककापणी प्रयोगासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारित यादीनुसार 18 गावांसाठी प्रत्येकी दोन असे एकूण 36 पीककापणी प्रयोग निश्‍चित केले आहेत. त्या अनुषंगाने नुकतेच आंबेतर्फे वाजे येथील शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाची कापणी प्रयोग करण्यात आली. त्या वेळी नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सीताराम वारगडा हे प्रयोगासाठी उपस्थित होते.

प्रयोगातील आकडेवारी पवर
पीककापणी प्रयोगातील प्राप्त आकडेवारीवरून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत कापणी प्रयोग हे पीकनिहाय नुकसान भरपाईची रक्कम निश्‍चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. सरकारलाही पीक उत्पन्नाचा अंदाज, शेतमालाची खरेदी, शेतमाल निर्यात धोरण अशा विविध बाबींसाठी पीककापणी प्रयोगातील आकडेवारीची आवश्यकता भासते. यासाठी कापणी प्रयोग पूर्ण करून 15 नोव्हेंबरला महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांना नेमून दिल्या. उद्दिष्टांनुसार हे प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करून सरकारच्या पवर पाठवली आहे, अशी माहिती नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांनी दिली.

Exit mobile version