Murud Beach: समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

उन्हाळी सुट्टीतील शेवटच्या आठवड्यात समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी आज सकाळपासून मुंबई, पुणा, सातारा, नाशिक या जिल्ह्यातुन पनवेल याठिकाणावरुन आपल्या वाहनातून पर्यटक मुरूड राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला व मुरूड शहरातील समुद्रकिनारा पाहण्यासाठी गर्दी केली होती. काही पर्यटकांनी स्वच्छ सुंदर आणि निळसर समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला तर काही जणांनी लहान मुलांसह समुद्राच्या वाळुवर चित्र रेखाटताना आनंद घेत होते.पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने लॉजिंग, हॉटेल तसेच खानावळ व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत होते. पर्यटकांसाठी स्वच्छता, सुरक्षितता आणि उत्तम सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी काळातही पर्यटन हंगाम कायम राहिल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version