सीएसके गुणतालिकेत अव्वल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल 2024 मधील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर 63 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरात संघाला सीएसकेने दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करण्यात यश आलं नाही. गुजरात संघाला 20 ओव्हरमध्ये 143-8 धावा करता आल्या. या विजयासह सीएसकेने आता पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. पहिल्या स्थानावर उडी घेतली असून 63 धावांनी विजय मिळवल्यामुळे नेट रन रेटमध्ये भरघोस फायदा झाला आहे.

पॉईंट टेबलमध्ये चार गुणांसह सीएसकेने पहिलं स्थान मिळवलं आहे. सीएसकेने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे नेट रनरेट +1.979 झाला आहे. तर गुजरात टायटन्स संघाचा नेट रनरेट -1.425 झाला असून सहाव्या क्रमांकावर संघाची घसरण झाली आहे. राजस्थान संघ आता दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. कोलकाता संघ तिसर्‍या, पंजाब किंग्स चौथ्या, आरसीबी पाचव्या आणि गुजरात आता सहाव्या स्थानावर आली आहे.

Exit mobile version