एलएईएस शाळेच्या व्यासपीठावर भारताची संस्कृती

| नेरळ | प्रतिनिधी |
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या उक्तीनुसार नेरळ येथील लॉर्ड आयप्पा एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये भारताची संस्कृती आणि परंपरा सोबत देशासाठी महत्वाचे योगदान देणारे महापुरुष आदी सर्व एलएईएस शाळेच्या व्यासपीठावर अवतरल्याचे दिसून आले. दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये नारद मुनी, श्रीगणेश आणि उंदीर मामा यांनी धमाल उडवून दिली.

नेरळ येथील लॉर्ड आय्यपा एज्युकेशन संस्थेच्या नायर किंग ग्रेटन, एलएईएस इंग्लिश स्कूल अ‍ॅड ज्युनियर कॉलेज यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा येथील ऋषभ गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. संगम 2023 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर,संस्थेचे मुख्य विश्‍वस्त श्रीराम राणे,कुमार नायर, विश्‍वस्त स्वरूप नायर, नितेश शाह, राज सोनावळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे, श्रद्धा कराळे, गीतांजली देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता नायर, उपमुख्याध्यापिका आशा कांबळे आदी मान्यवर तसेच दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी यांचे पालक उपस्थित होते.

Exit mobile version