| म्हसळा | वार्ताहर |
रायगड पोलीस यांच्या नियोजनातून म्हसळा पोलीस ठाणे यांच्यामार्फत नाईक-अंतुले महाविद्यालय आणि ए.आर. उंडरे इंग्लिश मीडियम विद्यालयात सायबर क्राईम आणि महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, अशोक तळवटकर, वंदना विचारे, महाविद्यालय विकास समिती सदस्य फजल हळदे, महादेव पाटील, निलम वेटकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ व्हावी म्हणून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात सातत्याने घेतले जातात.
भारतीय 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड पोलीस यांच्या नियोजनातून सायबर क्राईम जनजागृती, महिला सशक्तीकरण जनजागृती, रस्ते सुरक्षा जनजागृती आणि व्यसनमुक्त मुक्ती जनजागृती या उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. दिगंबर टेकळे यांच्या अध्यक्षतेत शनिवार, दि. 26 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात करण्यात आले होते. किशोर शितोळे आणि त्याच्या कला मंचाने एकाच पथनाट्यातून सायबर क्राईम, महिला सशक्तीकरण, रस्ते सुरक्षा आणि व्यसनमुक्त मुक्तीपर जनजागृती करण्यात आली. या चारही विषयांचा संदर्भ घेत उपस्थित 250 हून अधिक विद्यार्थ्यांशी म्हसळा सहायक पोलिस निरीक्षक संदिपान सोनवणे यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कानिफ भोसले यांनी मांडले. सदर कार्यक्रमात म्हसळा पोलिस ठाण्याचे अनेक पोलिस कर्मचारी यांच्यासह प्रा. एस.सी. समेळ, प्रा. डॉ. संजय बेंद्रे, प्रा. डॉ. एम.एच. सिद्दिकी, प्रा. आर.एस. मशाळे, प्रा.डॉ. जगदीश शिगवण, प्रा. मयूर बढे, प्रा. राजेंद्र हालोर, प्रा. सलमा नझिरी, प्रा. सादिका अंसारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संदीपान सोनवणे यांनी सांगितले की, सायबरच्या माध्यमातून आणी वेगवेगळ्या व्यसनातून तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळत आहे, त्यामुळे स्वतः चे, समाजाचे आणी कुटुंबाचे कौटुंबिक स्वास्थ्य दिवसेंदिवस विनाशाकडे वाटचाल करीत असून, भविष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांसह पालकांनी याचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन या गोष्टीना बंधन घालणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.