विविध स्पर्धांमध्ये सुवर्णमय कामगिरी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जगभरात सुरु असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी देदिप्यमान कामगिरी करीत देशाचा तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकावित ठेवला आहे.
नीरजने तिरंग्याचा राखला मान
बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं. हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. हे ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर नीरजने तिरंगा सोबत घेत फोटोसाठी पोज दिली. यादरम्यान त्याने पाकिस्तानचा ॲथलीट अर्शद नदीमलाही आपल्यासोबत फोटोसाठी बोलावलं याचे देखील सर्वत्र खूप कौतुक झालं. यानंतर आता नीरजने तिरंग्याबद्दल दाखवलेला आदर चर्चेचा विषय ठरला आहे. विजयानंतर नंतर हंगेरियनची एक महिला चाहती त्याच्याकडे आली. या महिलेने महिलेने हिंदीतून नीरजला ऑटोग्राफ मागितला. नीरजने लगेच होकार दिला, पण जेव्हा महिला चाहतीने ऑटोग्राफसाठी तिरंगा हातात धरला तेव्हा मात्र नीरजने भारतीय ध्वजावर सही करण्यास नकार दिला. त्याएवजी नीरजने त्या महिलेच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. नीरजने तिरंग्याबद्दल दाखवलेल्या आदराने सर्वांची मनं जिंकली.
यापूर्वीही तिरंग्याच्या सन्मान करत नीरजने चाहत्यांची मने जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंप्रमाणे नीरजनेही तिरंगा फडकावत आनंद साजरा केला. मात्र, सेलिब्रेशन केल्यानंतर बहुतांश खेळाडू आपल्या देशाचा ध्वज जमिनीवर फेकतात किंवा खुर्चीवर ठेवतात, पण नीरजने तसे केले नाही. उत्सवानंतर त्यांनी तिरंगा दुमडून पूर्ण आदराने आपल्या बॅगेत ठेवला. या घटनेनंतरही त्यांचे खूप कौतुक झाले होते. सोशल मीडियावर याबद्दल अनेक युजर्सनी पोस्ट केल्या आहेत. या वापरकर्त्यांने एका लिहीलं की अतिशय गोड हंगेरियन महिलेला नीरज चोप्राचा ऑटोग्राफ हवा होता. नीरज नक्की देईन म्हणाला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की तीला भारतीय ध्वजावर ऑटोग्राफ हवा आहे. मवहा नही साइन कर सक्ताफ नीरजने तिला सांगतलं. अखेरीस त्याने तिच्या शर्टच्या स्लीव्हवर सही केली. यावर देखील ती महिली खूप खुश झाली.