। पनवेल । वार्ताहर ।
एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे भासवून एका सायबर चोरट्याने गोवंडी येथे राहणार्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्या क्रेडीट कार्डमधून 1 लाख रुपयांची खरेदी करुन त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील अनोळखी सायबर चोरट्याविरोधात फसवणूकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज राठोड असे असून तो गोंवडी येथे राहण्यास आहे. याचवेळी एसबीआय बँकेच्या प्रतिनिधीने मनोजला संपर्क साधून त्याच्या क्रेडीट कार्डवरुन झालेल्या 1 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत त्याच्याकडे विचारणा केली. यावेळी मनोजने कुठल्याही प्रकारची खरेदी केली नसल्याचे सांगून सदरचा व्यवहार रद्द करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत सदरचा व्यवहार पूर्ण झाल्याने मनोजच्या क्रेडीट कार्डमध्ये 1 लाख रुपये गेल्याचा मेसेज त्याला प्राप्त झाला. त्यानंतर मनोजने आपले क्रेडीट कार्ड ब्लॉक करुन खारघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.