कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावानजिकच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर टाटा कारची सायकलस्वाराला जोरदार धडक बसली. या धडकेत सायकलस्वारचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.25) दुपारच्या सुमारास पुई गावानजिकच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर सायकलस्वार रविंद्र विठ्ठल मांजरे (48) हे गोवे गावाकडे जात होते. त्यावेळी मुंबईकडे कारने जाणारे गिरीष जाधव (50) यांनी सायकलस्वार रविंद्र मांजरे यांना पाठीमागून ठोकर मारून अपघात केला. या अपघातात सायकलस्वार रविंद्र मांजरे यांना गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास कोलाडचे सपोनि बी.बी.फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एस.जी.भोजकर हे करीत आहेत.

Exit mobile version