| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव कचेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या नेकस्वान कारची सायकलला धडक लागल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार मुलगा जखमी झाला. या अपघाताची फिर्याद भानुदास नरसिंगराव बिरासदार (48) रा. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अविनाश बाबू भूरण रा. पनवेल यांच्या ताब्यातील टाटा कंपनीची नेकस्वान कार अतिवेगाने चालवून सायकलला धडक दिली. या अपघातात सायकलस्वार मुलगा राजवर्धन दिपक गंगाजी हा जखमी झाला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.