डोंबिवली येथे उपचार सुरू
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील खांडा भागातील हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील विवाहित महिलेला प्रचंड मारहाण करण्याची घटना घडली होती. घरातून नेरळ स्टेशन पर्यंत मारहाण करण्याची घडली असून सदर महिला या डोंबिवली येथे आपल्या माहेरी पोहचली आणि नंतर तेथील पालिका रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. नेरळ पोलिसांकडे डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाणे यांनी गुन्हा वर्ग केल्यानंतर नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून पत्नीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ माजली आहे.
खांडा भागातील हनुमान मंदिर येथे एक कुटुंब राहते.त्या कुटुंबातील महिलेला तिचा पती दारूच्या नशेत सतत अपशब्द वापरायचा. तसेच घरातील घरात पाळीव प्राण्यांची विष्टा साफ करण्यासाठी वारंवार त्रास दिला जात होता. आपल्या आईबददल अपशब्द बोलू नका असे बोलुन विरोध केला होता. त्या गोष्टीचा राग नवऱ्यास आला आणि त्याने तिला शिवीगाळ करत कंबरेच्या चामडीपट्ट्याने बेदम मारहाण केली. डोळयावर मारहाण करून दुखापत केली. तसेच तिला उचलून फेकूनही दिले. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याने घरातील लहान मुलांना देखील मारहाण केली. कशीबशी नवऱ्याच्या तावडीतून सुटका करून ती विवाहित महिला घराबाहेरील रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशनकडे पळून जात असताना त्यांच्या मागे धावत जावून देखील मारहाण केली.
घटनेनंतर नेरळ येथे मुंबई कडे जाणारी लोकल पकडून आपला जीव वाचवण्यात यश मिळविले. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल मध्ये जखमी अवस्थेत असलेल्या या महिलेला काही प्रवाशांनी विचारपूस करून व्हिडिओ केला आणि समाज माध्यमांवर पाठवला गेला. माहेरी डोंबिवली येथे शास्त्रीनगर भागातील पालिका रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असून तेथील विष्णुनगर पोलीस ठाणे यांच्याकडून त्याबाबत तक्रार नोंद करण्यात आली होती. विष्णुनगर पोलीस ठाणे येथून हा गुन्हा नेरळ पोलीस ठाणे येथे वर्ग झाला आहे.
व्हायरल व्हिडिआमुळे गांभीर्य वाढले.. पतीच्या तावडीतून सुटलेली विवाहित मुंबईकडे जाणारी लोकल पकडून डोंबिवली येथे पोहचली. या प्रवास दरम्यान लोकल मधील अन्य महिला प्रवासी यांनी त्यांच्या बाबतीतील व्हिडिओ तयार केला आणि व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.