| पनवेल | वार्ताहर |
भरधाव मोटार लॉरीवरील चालकाने एका सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघात सायकलस्वराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळोजा एमआयडीसी पडघा रोड येथे घडली आहे. जगदीश जगराम (26) हा त्याच्या ताब्यातील मोटार लॉरी क्रमांक एम एच 01 डी आर 3619 हा घेऊन तळोजा एमआयडीसी पडघा रोड येथून जात असताना त्याने एका सायकलीस ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात कृष्ण सुरेंद्रप्रसाद सिंह (44) हा सायकलस्वार गाडीच्या चाकाखाली येऊन त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.