| रसायनी | वार्ताहर |
बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व पिल्लेज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय रसायनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सायक्लोथॉन व मॅरेथॉन स्पर्धा वार शनिवार (दि.16) मार्च रोजी सिध्देश्वरी कॉर्नर ते लोहोप गावापर्यंत आयोजित केले होते तसेच कैरे , बोरिवली, वाशीवली, वडगाव, तळवली, वाणिवली, लोहोप, इसांबे, माजगाव, आंबिवली या गावामध्ये प्लास्टिक बंदी जनजागृतीवर नागरिकांना मार्गदर्शन करून राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थिनीनी घरोघरी जाऊन कापडी बॅग वाटप केल्या. विजयी खेळांडूना पारितोषिक, सन्मान चिन्ह, व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित रवींद्र रघुवंशी प्लांट हेड बिर्ला कार्बन, निखिल भामरे एच आर मॅनेजर बिर्ला कार्बन, अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, रेश्मा कुरूप, अध्यक्ष रोटरी क्लब पाताळगंगा, कलावती उपाध्याय शिक्षिका, लक्ष्मण मोरे, अनिता मॅडम, निलेश जाधव, किशोर पाटील, विजय शिंदे, रोहित इंगळे, हरेश जाधव, रोहिदास शिवले, पिल्लेज महाविद्यालयातील इत्यादी पाहुणे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.





