डी. डी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी स्व. दिनकर दामोदर तथा डी. डी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर रामवाडी-पेण येथे डॉ. के. डी. पाटील, बाळ पाटील, माजी शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र राज्य सूर्यकांत पाटील तसेच माजी विभागीय संचालक मुंबई विभाग व्ही. एस. म्हात्रे याच्या उपस्थितीत करण्यात आले. 27 डिसेंबर हा पाटील यांचा जन्मदिवस, त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अलौकिक कार्य चिरकाळापर्यत स्मरणात रहावे या उद्देशाने डॉ. अमोल पाटील व परिवाराकडून यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचा पुतळा बनविण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, संस्थेचे अध्यक्ष पी. डी. पाटील, उपाध्यक्ष कृष्णा वर्तक, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सुनीता जोशी, प्रकाश रामाणे, अक्षय पाटील, अमरचंद पाटील, सूर्यकांत पाटील, स. रा. म्हात्रे, सुशांत जोशी, मित्र परिवार, सहकारी तसेच आदर्श प्राथमिक विद्यामंदिर रामवाडी शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version