| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव पुणे महत्वाच्या राज्य मार्गावर दिवसेन दिवस अपघात घडत आहेत. तीन महिन्यापूर्वी ताम्हिणी घाटात कोंढेथर गावचे हद्दीत विदर्भातून कोकणात पर्यटनासाठी आलेली कार दरीत घसरून झालेल्या अपघातात तीन प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. संबंधित खात्याने ताम्हिणी घाटातील अवघड धोकादायक वळणे काढून सुलभ व पर्यायी रस्ता काढावा तसेच ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. तेथे संरक्षक भिंत उभ्या कराव्यात व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकातून सतत होत आहे. या घाटातील धोकादायक वळणे प्रवाशांच्या मुळावर येत असून ती त्यांच्या जीवावर बेतत आहेत.
या मार्गावर वाहतुकीमध्ये दिवसेनिदिवस वाढ होत आहे. या घाटातील खोल दर्या हे प्रवाशांचे आकर्षण झाले आहे. या दर्या व डोंगर रस्त्याच्या कडेलाच असल्यामुळे तेथे काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नसल्यामुळे पर्यटकांना व प्रवाशांना धोका जाणवू लागला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे अशी मागणी प्रवासी पर्यटकातून होत आहे.