तहसिल कार्यालयाची तारीख पे तारीख…

। खोपोली । प्रतिनिधी ।
बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण समाजाला जाणार्‍या गारमाल वाघ्रणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायाला अडचण ठरणार्‍या शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला आहे. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण करीत येथील नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे चित्र उभे केले आहे. मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते, त्यामुळे प्रकल्प कसा उभा करायचा ते या कंपनीने पाहावे आमचा शासनमान्य रस्ता आहे तोच ठेवावा अशी मागणी करीत याबाबत तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्याने 22 ऑक्टोबरला सुनावणी झाली. पुन्हा सात दिवसाची मुदत देऊन सर्व कागदपत्र सादर करावे अशी तहसीलदार यांनी दिलेल्या सुचनेमुळे गारमाळ ग्रामस्थ या रस्त्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी तारीख पे तारीखमुळे फेर्‍या सुरू झाल्या आहेत. मात्र ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जुनाच रस्ता हवाय असा पवित्रा घेतल्याने आता पुढील सात दिवसांनी होणार्‍या सुनावणीकडे डोळे लावून आहेत.

गारमाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असल्याने येथील जमिनी खरेदी करून सध्या काम करणार्‍या सुप्रिया फार्मस या बांधकाम कंपनीमार्फत बंगलो सिस्टीम केल्याने मुंबईसह अनेक ठिकाणच्या धनिकांनी हे बंगले खरेदी केल्याने व्यवसायात ग्राहकांना अडचण करीत असलेला जिल्हा परिषदेचा रस्ता ज्या रस्त्यावर नागरिकांना जाण्या-येण्याची सुविधा असणारा शासनाने मंजूर करून लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या 500 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद करीत मार्ग बदलल्याने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. मात्र कंपनीकडून सदरचा रस्त्याबाबत परवानगी घेऊन काम करीत असल्याचे सांगण्यात येत असले तरी याबाबत दिशाभूल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. तहसीलदारांनी दुसर्‍यांदा घेतलेल्या सुनावणीच्या दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने अ‍ॅड. मानसी सोगे यांनी बाजू मांडली. तर कंपनीच्यावतीने अ‍ॅड. गोडबोले यावेळी व्यवस्थापन अधिकारी संजय खंडागळे पुन्हा सात दिवसानंतर सर्व कागदपत्र घेऊन हजर राहावे असे आदेश 22 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीच्या दरम्यान दिल्याने हक्काच्या रस्त्यासाठी तारिख पे तारीख चा फेरा सुरू झाल्या असल्या तरी ग्रामस्थांनी आपला हक्काचा रस्ता मिळवायचाच असा पवित्रा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण शेडगे, गणेश आखाडे, सुभाष तिकोणे, शैलेश तुपे, विष्णू चिंचवडे, गुरुनाथ आखाडे, संतोष कोडभर, सुशिला दळवी, गणपत चिंचवडे, यमुनाबाई तुपे, संगिता तुपे, जनाबाई तुपे, रखमाबाई शेडगे, सोनाबाई शेडगे, संदीप वाघमारे आदी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांनी कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Exit mobile version