पोलीस ठाण्यात दत्तजयंती साजरी

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 नजिक निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या कोलाड पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी बांधण्यात आलेल्या दत्तमंदिरात कोलाड पोलीस सहाय्यक निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयंती मोठया भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण दत्तमंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तसेच संपूर्ण कोलाड ठाण्याचा परिसर सुशोभिकरण करण्यात आले होते. सकाळी दत्तमंदिरात अभिषेक व श्री सत्यनारायणाची महापूजा पोलीस अंमलदार राजेंद्र राठोड यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी दत्त दर्शनासाठी कोलाड परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे व कोलाड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अंमलदार यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version